आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढेंनी कामावरून काढून टाकलेल्या PMP कर्मचा-याची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील पीएमपीएमएलच्या निलंबित कर्मचा-याने मंगळवारी रात्री आत्महत्या केली. कामावरून काढून टाकल्यानंतर नैराश्यात गेल्याने हे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. 

 

तुकाराम निवृती मुंडकर (वय 42, रा. हनुमान कॉलनी नं.6, चक्रपाणी रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या पीएमपीएमएल कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुंडकर यांनी राहत्या घरातील पंख्याला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

तत्कालीन पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सतत गैरहजर राहणा-या पीएमपीमएलच्या 158 बसचालकांना सेवेतून बडतर्फ केले होते. त्यात तुकाराम मुंडकर यांचाही समावेश होता. कामावरून काढून टाकल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून ते नैराश्यात गेले होते. 

 

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तुकाराम मुंडकर यांच्या पत्नी आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या. त्यावेळी तुकाराम मुंडकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. पुढील तपास भोसरी पोलिस करत आहेत.   

बातम्या आणखी आहेत...