आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीच्या पुणे, अहमदनगर येथील मालमत्ता जप्त; हडपसर भागात कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/अहमदनगर- हिरे व्यापारी नीरव मोदीच्या पुणे आणि अहमदनगर येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. पंजाब नॅशनल बँकेत हिरे व्यापारी नीरव मोदीने केलेल्या 11 हजार 400 कोटींच्या घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (इडी) पुण्यातील त्याच्या सहा निवासी मालमत्ता, दहा कार्यालये, दोन सदनिका जप्त केल्या. अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील 135 एकर जमीन जप्त केली आहे. 

 


पुण्यातील मालमत्ता मोदी व त्याची पत्नी अमी यांच्या नावावर आहे. हडपसर भागात नीरव मोदी याची सदनिका व मालमत्ता आहेत. मोदीचा कर्जत तालुक्यात 53 एकर जागेत सौर प्रकल्प आहे. तो 70 कोटींचा असून त्यावर टाच आणण्यात आली. आतापर्यंत मोदी याची एकूण 6393 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...