आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा-बायकोच्या भांडणात गरोदर मेहुणीची हत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नवरा-बायकोच्या भांडणात गरोदर मेहुणीचा खून झाल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. मुन्नीबाई देवा जाधव (वय-२५ रा.भुंडे वस्ती बावधान) असे मयत महिलेचे नाव असून ती गर्भवती होती. याप्रकरणी हिंजवडी पोलीसांनी मुख्य आरोपी हिरा देवू चव्हाण (वय-३० रा.लमाण तांडा पाषाण) याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बावधान भुंडे वस्ती येथे आरोपी हिरा चव्हाण आणि त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ हे दोघे पत्नीला घरी नेण्यासाठी आले होते. परंतु, पत्नी लक्ष्मी चव्हाण हिने सोबत येणास नकार दिल्याने दोघांत भांडण सुरू झाले. हे भांडण सोडवण्यासाठी लक्ष्मीची बहीण मुन्नीबाई जाधव या पुढे आल्या. त्यांनी मध्यस्थी करण्यास सुरूवात केली. तेव्हा आरोपी हिरा जाधवच्या १७ वर्षीय अल्पवयीन भावाने मुन्नीबाईवर धावून जात गालाच्या खालच्या भागावर लोखंडी नळीने घाव केले. यानंतर आरोपी हिरा चव्हाण याने देखील तिला जोरात जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर दोघांनीही मुन्नाबाईला जबर मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला. मुन्नाबाई या गर्भवती होत्या अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी हिरा चव्हाण याला अल्पवयीन भावासह अटक केली आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...