आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे - औरंगाबाद एशियाड बस कंटेनरला धडकली, तीस प्रवाशी जखमी, 10 गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर- पस्तीस प्रवाशांना घेऊन पुणे येथून रविवारी (11 फेब्रुवारी) सकाळी 8.30 वाजता निघालेली पुणे- आैरंगाबाद एशियाड बसला रांजणगाव आैद्योगिक वसाहतीजवळ अपघात झाला. रांजनगाव आैद्योगिक वसाहतीजवळील चौफुलीवर अचानक महामार्गावर घुसलेल्या कंटेनरवर ताशी 50 कि. मी. वेगाने असलेली एशियाड धडकल्याने तीस जण जखणी झाले. यातील दहा गंभीर जखमी प्रवाशांना शिरूर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. 

 

याबाबतची माहिती अशी की, रविवारी सकाळी एम. एच. 20 बी. एल. 3809 ही एक थांबा नगर विनावाहक एशियाड सकाळी 8.30 वाजता शिवाजीनगर येथून निघाली. गाडीत 35 प्रवाशी होते. सकाळी 10 वाजता एशियाडने रांजणगाव पार केले. आैद्योगिक वसाहतीमधून जाताना एका ठिकाणी चौफुली आहे. एशियाडचा वेग ताशी 50 कि. मी. पेक्षा जास्त असताना अचानक मध्येच एक मोठा कंटेनर घुसला. अशात चालकाने एकदम ब्रेक दाबल्याने एशियाडमधील प्रवाशी पुढच्या सिटवर आदळले. एशियाडमध्ये ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया आणि छोटी मुले यांना मोठ्या प्रमाणावर मार लागला. एशियाडमध्ये साधा प्रथमोपचार पेटीदेखील नसल्याने जखणी प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. अपघातामध्ये प्रवाशांच्या आेठात दात घुसणे, नाक, कपाळ, हात आणि गुडघ्याला जबर मार लागला. चालकाच्या बाजूने एशियाडचे मोठे नुकसान झाले. चालकही या अपघातात जबर जखमी झाला. 

 

एस.टी. महामंडळाचे दूर्लक्ष-

 

एस. टी. च्या सुरक्षेसंबंधी गप्पा मारणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला अपघात झाल्याचे कळविल्यानंतर एशियाडमधील प्रवाशांना पुढे जाण्यासाठी गाडी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. परिसरातील नागरिकांनी 108 क्रमांकाची रूग्णवाहिका मागविली होती. गंभीर जखमी प्रवाशांना 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेतून शिरूर सामान्य जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. एकच रूग्णवाहिका असल्याने केवळ दहा प्रवाशीच त्यामध्ये जाऊ शकले. इतर प्रवाशांना रूग्णालयात पाठविण्याची काहीच व्यवस्था नसल्याने प्रत्येकाला आपापल्या परीने मार्गस्थ व्हावे लागले. उर्वरित प्रवाशांना साधी बस थांबवून टप्याटप्याने पुढे पाठविण्यात आले. मोठा अपघात झालेला असताना महामंडळाच्या इतर गाड्यांना प्रवाशी हात दाखवित होते परंतु अनेक बसेस न थांबताच निघून जात होत्या. अपघात झालेल्या एशियाडमध्ये प्रथमोपचाराचे साधे साहित्यही ठेवण्यात आलेले नव्हते. एशियाडचे तिकीट असताना जखमी प्रवाशांना साध्या गाडीतून उभे राहून प्रवास करावा लागला. 

बातम्या आणखी आहेत...