आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: मुलगा हाेण्यासाठी अंधश्रध्देच्या माध्यमातून 26 लाखांची फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- तुमच्या घरावर करणी व बाहेरची बाधा अाहे असे सांगत, त्यामुळे तुम्हास मुलगा हाेत नाही. याबाबतच उपाययाेजना करण्याचे बहाण्याने एका इसमाची 26 लाख रुपयांची फसवणुक करण्यात अाल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी सुनील रामशरन सराेज (रा.खराडी,पुणे) व 50 वर्षीय एक महिला यांच्या विराेधात हडपसर पाेलीस ठाण्यात अार्थिक फसवणुक अाणि महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ट व अघाेरी प्रथा व जादुटाेणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

 

याबाबत पाेलीसांकडे समीर विलास कामठे (वय-33, रा. मांजरी, ता. हवेली, पुणे) याने फिर्याद दिली अाहे. समीर कामठे याचे वडील मुंढवा येथील एका कंपनीत कामास असून त्याठिकाणी त्यांची अाराेपी सुनील सराेज याच्याशी अाेळख झाली. कामठे यांचा मुलगा समीर याचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याची गाेष्ट त्यांनी सराेज यास सांगितली हाेती. तसेच त्यास मुलगा हाेत नाही असे ही सांगितले. त्यावेळी सराेजने अापल्या अाेळखीतील एक महिला देवरुषी असून ती सर्व समस्यांचे निराकरण करते असे सांगुन तिच्याकडे त्यांना अाॅक्टाेबर 2016 पासून घेऊन जाऊ लागले. महिलेने अापल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत सर्व संकटाचे निराकरण करु शकते असे सांगितले. 

 

त्यानंतर संबंधित महिलेने घरात मुलगा हवा असेल तर तिने सांगितलेल्या सर्व गाेष्टी केल्या तर तुमचा घरात मुलगा येर्इल. तसेच तुमच्या घरात अार्थिक भरभराट हाेर्इल असे सांगितले. जर या गाेष्टी केल्या नाहीतर तर मात्र, तुमच्या घरावर अनिष्ट संकंट येर्इल तसेच तुमच्या घरातील लाेकांचे मृत्यु हाेर्इल अशी भिती निर्माण  केली. त्यानंतर करणी काढून टाकण्यासाठी मंतरलेले पाणी, अंगारा, वेगवेगळया वस्तू देऊन त्या घरात ठेवण्यास सांगितल्या. 

 

अशाप्रकारे अातापर्यंत वेळाेवेळी विलास कामठे यांचेकडून 17 लाख 20 हजार रुपये ट्रान्झेक्शन करुन अाराेपींनी घेतले. तर सुमारे नऊ लाख रुपये राेख स्वरुपात घेऊन फसवणुक केली अाहे. डिसेंबर महिन्यात विलास कामठे यांचे मानसिक संतुलन ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर, मुलाने त्यांचे बॅंक खात्याचे व्यवहार तपासल्यावर सदर बाब उघडकीस अाली. याप्रकरणी हडपसर पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे पुढील तपास करीत अाहे.   

बातम्या आणखी आहेत...