आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: गर्लफ्रेंडची छेड काढल्याने जाब विचारला म्हणून केला प्रियकराचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या प्रेयसीची दाेन जणांनी छेड काढल्याने, त्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धारदार चाकुने वार करुन खुन करण्यात अाल्याचा प्रकार साेमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरात घडला अाहे. सनी विलास शिंदे (वय-18) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी पाेलीसांनी तीन अाराेपींना अटक केली अाहे. 

 

अाकाश मल्लेश गायगाेळे (वय-19, रा. मार्केटयार्ड, पुणे), सुरजित अालसिंग कलानी (24, रा. बिबवेवाडी, पुणे) व रितेश श्रीराम बलीपाठक (32, रा. मार्केटयार्ड, पुणे) अशी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने अाराेपींना पाेलीस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहे. याबाबत मार्केटयार्ड पाेलीस ठाण्यात अाकाश शिंदे (21, रा. धायरी, पुणे) याने अाराेपीं विराेधात फिर्याद दिली अाहे.

 

अाकाश शिंदे यांचा मावसभाऊ सनी शिंदे हा मार्केटयार्ड मध्ये मजुरीचे काम करत हाेता व यादरम्यान त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले हाेते.सदर तरुणीची रितेश व अाकाश गायगाेळे यांनी छेड काढल्याने त्यांच्यात भांडणे झालेली हाेती. याबाबतचा जाब विचारण्यासाठी सनी शिंदे हा अाराेपींना भेटण्याकरिता गेला असता त्याठिकाणी त्यांच्यात वादविवाद हाेऊन अाराेपींनी सनी शिंदे यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर सुरजित कलानी याने त्याचे जवळील रॅम्बाे सुराने सनी याचे डावे छातीवर जाेराने वार करुन त्यास गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले अाहे. मार्केटयार्ड पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक अार.जे. हाेनराव याबाबत पुढील तपास करीत अाहे.

बातम्या आणखी आहेत...