आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या जाचास कंटाळून पतीची अात्महत्या, पत्नीविरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अार्इ- वडिलांना भेटण्यास पत्नीने विराेध दर्शवत, अात्महत्येची धमकी देत तुम्हा सर्वांना अडकविण्याची धमकी दिल्याने व सततच्या जाचास कंटाळून पतीने अात्महत्या केल्याचा प्रकार येरवडातील नागपूर चाळ येथे घडला अाहे. गाेपालसिंग सुग्रिवसिंग चाैहान (वय- 30, रा. येरवडा, पुणे) असे अात्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अाहे. याप्रकरणी त्याची पत्नी संगीता चाैहान (28)हिच्या विराेधात पाेलिसांनी अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला अाहे.

 

याबाबत अाराेपी सुनेविराेधात सासू शिलादेवी चाैहान (52, रा. अहमदाबाद, गुजरात) यांनी पाेलिसांकडे तक्रार दिली अाहे. गाेपालसिंग व शीलादेवी यांचा सन 2014 मध्ये विवाह झाला हाेता. मात्र, त्यानंतर त्यांना मुलगा हाेत नसल्याचे कारणावरुन ती गाेपालसिंग याला अार्इवडिलांना फाेन करु देत नव्हती. तसेच कंपनीतून रजा घेऊन गाेपालसिंग गावी गेल्यास त्यावरुन त्याच्याशी ती वादविवाद करत असत. यापुढील काळात अार्इवडीलांना भेटल्यास मी गळफास घेर्इन, जाळून घेवून अात्महत्या करेन अशी धमकी देत त्याचा मानसिक छळ करत असत. 

 

सततच्या त्रासाला कंटाळलेल्या गाेपालसिंग याने अखेर राहत्या घरात फॅनला अाेढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन अात्महत्या केली. अात्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पाेलिसांना मिळाली असून ‘त्यामध्ये माझ्या अात्महत्येस पत्नी जबाबदार असून तिला शिक्षा व्हावी’ अशी मागणी केली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...