आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे क्राईम: डॉलरच्या मोहापायी गमावले पाच लाख रुपये; महिलेने उकळले चार लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विमाननगर येथील सनी अग्रवाल (वय-28) या तरुणास यूएस डाॅलर करन्सी बदलून देताे असे अमिष सूरज सिंग, दोन अनाेळखी इसम व एक महिला यांनी दाखविले हाेते. त्याबदल्यात अग्रवाल यांचेकडून पाच लाख रुपये घेऊन, त्याबदल्यात वर्तमानपत्राचे गुंडाळलेले बंडल देऊन सदर रकमेची फसवणूक केली अाहे. याबाबत हडपसर पाेलिस ठाण्यात अाराेपीं विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

 

महिलेला चार लाखांचा ऑनलाईन गंडा-

 

दुसऱ्या प्रकरणात मुंढवा येथील अमरितपाल गुमलाेरा (वय-41) यांना एक अनाेळखी इसम व महिलाने संगनमत फाेन करुन, तुमचे मित्रास दिल्ली विमानतळ येथे दिल्ली कस्टम विभागाने पकडल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात असलेले चेक व एक मिलीयन यूएसडी एवढी रक्कम त्यांना मिळून अाली अाहे असे खाेटे सांगून, गुमलाेरा यांचा विश्वास संपादन करुन अाराेपी इसम व महिलेने त्यांच्या बॅंकेतील खात्यावर तीन लाख 89 हजार रुपये जमा करण्यास सांगून त्यांची फसवणूक केली अाहे. 

 

सहा लाख रुपयांची घरफाेडी-

 

खडकी येथील अर्जुन मार्ग येथील एका बंगल्यात चाेरटयांनी शिरुन, राेख 25 हजार रुपये व साेन्याचे दागिने असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरुन नेला अाहे. याप्रकरणी विश्वजीत मित्रा (39) यांनी पाेलिसांकडे अज्ञात चाेरटयांविराेधात तक्रार दिली अाहे. मित्रा यांचा बंगला कुलुप लावून बंद असताना, काेणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या राहत्या घरात कपांऊंडच्या जाळीवरुन उडी मारुन त्यांच्या घराचा मागील दरवाजा उकलून त्याचा काेयंडा व चाैकटीची फळी ताेडून अात प्रवेश केला. बेडरुममधील दाेन लाकडी कपाटातील कुलुप ताेडून त्यातील 25 हजार रुपये व साेन्याचे दागिने चाेरी करुन नेले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...