आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: भोंदु ख्रिस्ती धर्मगुरुवर पोलिसांची मेहरबानी, तक्रार देऊन कारवाई नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पी. डब्ल्यू. डी.च्या मैदानावर ‘मुक्ती का महाेत्सव’ या कार्यक्रमाचे अायाेजन करुन, विविध अाजार प्रार्थनेद्वारे बरा करण्याचा दावा करुन चमत्काराच्या माध्यमातून अंधश्रध्देला खतपाणी घालणााऱ्या भोंदु ख्रिस्ती धर्मगुरु विराेधात तक्रार देऊनही पाेलिस काेणतीच कारवार्इ करत नाही. पाेलिसांनी भाेंदु धर्मगुरुंना अटक करुन त्यांची सखाेल चाैकशी करावी अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस)च्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी केली अाहे.

 

याबाबत सांगवी पाेलिस ठाण्यात किरण संजय माेरे व जयवंत दत्तात्र्य जाधव यांनी तक्रार दिलेली अाहे. नाेव्हेंबर 2017 मध्ये सांगवीतील पीडब्ल्यु मैदान येथे पाप, अाजारपण, शाप अाणि दुष्ट अात्मा यापासुन या व मुक्ती मिळवा याबाबतचे तीन दिवसाचे शिबीर भाेंदु ख्रिस्ती धर्मगुरु माेहन सी लाइरस, भार्इ: अ. अप्पादुरार्इ यांनी अायाेजित केले हाेते. जयवंत जाधव यांना त्वचेचा राेग असल्याने ते सदर कार्यक्रमात येशूला प्रार्थना केल्यानंतर राेग बरा हाेताे असे पाेस्टरद्वारे सांगितल्याने सहभागी झाले. त्याठिकाणी एका बादलीत सर्वांकडून पैसे गाेळा करण्यात अाले. 

 

त्यानंतर लाजरस यांनी तमीळमध्ये व्याख्यान दिले त्याचे भाषांतर करुन तेथील व्यक्तीने सांगितले की, मी कर्नाटक मध्ये कार्यक्रमासाठी गेलाे हाेताे. तेथे एका व्यक्तीच्या मुलाच्या मानेवर गाठ हाेती ती गाठ प्रार्थना केल्यावर निघून गेली हाेती. तसेच एक व्यक्ती खूप दारु पीत हाेता त्यास प्रार्थना करण्यास सांगितल्यावर त्याचे दारुचे व्यसन सुटले. त्यानंतर एक महिला स्टेजवर लहान बाळास घेवून अाली व तिने सांगितले की, माझ्या बाळाच्या हद्याचे ठाेके खूप वाढतात अाॅपरेशन केले तर त्रास कमी हाेर्इल असे डाॅक्टरांनी सांगितले. त्यानंतर मी याच कार्यक्रमात अाले व तेथे प्रार्थना केली त्यानंतर माझ्या मुलाचे हदयाचे ठाेके अाता कमी झाले असून ताे बरा झाला अाहे.

 

त्यानंतर धर्मगुरुने सांगितले की, काेणाला काही अाजार असेल तर त्याठिकाणी प्रार्थना झाल्यानंतर माझा हात ठेवा राेग बरा हाेर्इल. अशाप्रकारे खाेटे दावे करुन लाेकांची फसवणूक केली जात असल्याचे लक्षात येताच,  तक्रारदार यांनी व्हिडिअाे शुटिंग करत याबाबत तक्रार पाेलिसांकडे दिली. मात्र, दाेन महिन्यानंतर ही पाेलिस याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कारवार्इ करत नसल्याने अंनिसने कारवार्इची मागणी केली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...