आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: तुप विक्रीच्या बहाण्याने पोलिसाच्याच घरी चोरटयांची हातसफार्इ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील थरमॅक्स चाैक येथे एका सहाय्यक पाेलीस फाैजदाराच्या घरात, तुप विक्रीच्या बहाण्याने येऊन दाेन चाेरटयांनी हातसफार्इ करत सहा ताेळे वजनाचे साेन्याचे दागिने व काही राेख रक्कम घेवून पसार झाले अाहेत, याप्रकरणी निगडी पाेलीस ठाण्यात कुसुम लालासाहेब जाेडगे (वय-58) यांनी दाेन अनाेळखी अाराेपीं विराेधात तक्रार दिली अाहे.

 
तक्रारदार कुसुम जाेडगे यांचा मुलगा ठाणे पाेलीस दलात सहाय्यक पाेलीस फाैजदार म्हणून काम करत असून चिंचवड मधील थरमॅक्स चाैकात त्यांचे घर अाहे. त्यांचा पाेलीस दलात काम करणारा मुलगा ठाणे येथे राहताे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याचे सुमारास शिवरात्री निमित्त त्यांचे पती हे शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गेले हाेते. त्यावेळी त्या घरी एकटयाच असताना दाेन अनाेळखी इसम तूप विक्री करत त्याठिकाणी अाले. त्यांनी तुप विकत घेतल्यानंतर, तुपाचे पैसे देण्याकरिता त्यांनी डब्यातून पैसे काढून दिले. 

 

त्यावेळी एका भामटयाने त्यांचा नातेवार्इकाचा मुलगा असल्याचा बहाणा करत त्यांना माेबार्इलवर बाेलण्यास दिले. सदर ठिकाणी फाेनला नेटवर्क मिळत नसल्याचे सांगत त्यांना दुसऱ्या खाेलीत जाऊन बाेला असे सांगितले. जाेडगे या माेबार्इलवर बाेलत दुसरीकडे गेल्याचा फायदा उठवत, चाेरटयांनी पैशांचा डब्यासह पळ काढला. याबाबत निगडी पाेलीस पुढील तपास करीत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...