आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: बिल्डर नरेश वाधवानी विराेधात सात काेटी रूपये फसवणुकीचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील बांधकाम व्यवसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यासह एकूण सहा जणांविराेधात सांगवी पाेलिस ठाण्यात सात काेटी रुपयांची अार्थिक फसवणूक करण्यात अाल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याबाबत खेमचंद उत्तमचंद भाेजवाणी (वय-53,रा.वाकड, पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली अाहे. 

 

नरेश वाधवानीसह सुरेश जयवंत काटे, वैशाली चंद्रकांत काटे, राजू जयवंत काटे, जनाबार्इ जयवंत काटे, संताेष जयवंत काटे (सर्व रा. पिंपळे साैदागर, पुणे) या अाराेपीं विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पिंपळे साैदागर येथील सर्व्हे क्रमांक 40 वरील 120 अार जमिनीची खरेदी अाणि विकसनचे हक्क बांधकाम व्यवसायिक कन्हैयालाल हाेतचंद मतानी यांच्याकडे असताना, सदर भागीदाराचे जमिनीचे खरेदी व विकसनचे हक्क नरेश वाधवानी यांनी परस्पर स्वत:कडे करवून घेतले. काेणत्याही कायदेशीर गाेष्टींची पूर्तता न करता वाधवानी यांनी भागीदार मतानी यांची सहा काेटी 92 लाख रुपयांची फसवणूक केली. सांगवी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक ए. बी. शेटे याबाबत पुढील तपास करीत अाहे. यापूर्वी ही डिसेंबर 2017 मध्ये दुसऱ्या एका जमीन गैरव्यवहार प्रकरणात  पाेलिसांनी नरेश वाधवानी यास बनावट कागदपत्रे व अार्थिक फसवणूक प्रकरणी अटक केली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...