आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: पत्नीला हॉटेलातील लॉजवर भेटायला बोलावले, मग पतीने या कारणामुळे केली हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा नाडीने गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यातील हाॅटेल सुयश येथे घडली अाहे. दीपा मलयकुमार सिंग ऊर्फ दिपा राजेंद्र अस्वरे (वय- 26 मु. रा. चिंचवड, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव अाहे. याप्रकरणी तिचा पती मलयकुमार देवेंद्रप्रसाद सिंग (37) याला पाेलिसांनी अटक केली अाहे. 

 

मलयकुमार सिंग व दिपा अास्वारे सिंग हे पती-पत्नी मुंबर्इतील दहिसर येथील रहिवासी असून त्यांचे दाेन वर्षापूर्वी लग्न झाले हाेते. मागील काही दिवसांपासून काैटुंबिक वादातून दिपा ही पती साेबत न राहता, पिंपरी-चिंचवडमध्ये तिच्या माहेरी अार्इवडीलांकडे राहण्यास अाली हाेती. मलयकुमार हा पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अाल्याने त्याने पत्नीला ताे राहत असलेल्या हाॅटेल मध्ये बाेलवुन घेतले. 

 

पुण्यातील हाॅटेल सुयश येथील एका खाेलीत पत्नी भेटण्यास अाली असता, पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा अाराेप केला. त्यामुळे सदर दाेघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी पतीने तिचा नाडीने गळा अावळून खून केला. या घटनेनंतर मलयकुमार सिंग हा समर्थ पाेलिस ठाण्यात स्वत:हून हजर हाेऊन त्याने गुन्हयाची कबुली दिली. पाेलिसांनी त्यास अटक करुन त्याच्या विराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला अाहे. सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस. डी. चव्हाण याबाबत पुढील तपास करीत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...