आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हायकोर्ट खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचे कामबंद अांदाेलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबर्इ उच्च न्यायालयाचे खंडपीड पुणे मध्ये करावे या मागणीसाठी पुणे सत्र न्यायालय, पिंपरी-चिंचवड न्यायालयसह जिल्हयातील न्यायालयांमध्ये वकीलांची संघटना असलेल्या बार असाेसिएशन तर्फे कामबंद अांदाेलन गुरुवारी करण्यात अाले. काेल्हापूर येथील खंडपीठास राज्यसरकारने अार्थिक निधी देण्याचे अाश्वासन दिल्याने, पुणे खंडपीठाच्या मागणीसाठी बार असाेसिएशनने पुढाकार घेतला अाहे.

 

पुणे बार असाेसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दाैंडकर म्हणाले, उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे याकरिता अनेकवेळा राज्यसरकार तसेच उच्च न्यायालयात पत्रव्यवहार करण्यात अाला अाहे. मात्र, सरकारने याबाबत काेणतीच दखल घेतलेली नाही. काेल्हापूर येथील खंडपीठासाठी मंत्री चंद्रकांत पाटील अाग्रही अाहेत. मात्र, पुणे शिक्षक मतदाारसंघातून निवडून जाऊनही पुणे खंडपीठासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून अाले नाही. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट खंडपीठाच्या विषयावर माैन बाळगत अाहे. अांदाेलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी 20 फेब्रुवारी राेजी पुणे न्यायालयात हाेणाऱ्या बैठकीस बापट हजर न राहिल्यास त्यांच्या घरावर माेर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येर्इल असा इशारा देण्यात अाला अाहे. 

 

पुणे बाार असाेसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार यांनी सांगितले की, काेल्हापुरला खंडपीठ हाेण्याकरिता अामचा विराेध नाही. मात्र, पुण्यात ही खंडपीठास मंजुरी द्या अशी मागणी मागील 40 वर्षापासून करण्यात येत अाहे.पुणे खंडपीठाच्या मागणीकरिता यापुढील काळात निकराचा लढा उभा करुन चिवट लढा द्यावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...