आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ शुक्रवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११३ वा पदवी प्रदान समारंभ शुक्रवार, १ जून २०१८ रोजी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर एम. मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात एकूण ११ जणांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वर्षातून दोनदा पदवी प्रदान कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्ष २०१६-१७ मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७,२४२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. यात पीएचडी पदवी १०४, एम.फिल ५४, पदव्युत्तर पदवी ३००६, पदव्युत्तर पदविका ६३, पदवी ३९९४ आणि पदविका प्राप्त २१ जणांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, सायंकाळच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी ११ ते दुपारी ४ या काळात  स्नातकांना पदव्या दिल्या जातील, असे विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...