आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बोगस काॅल सेंटरवर छापा, अमेरिकन नागरिकांची फसवणूक;175 नागरिकांना गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खराडी येथील सिटी व्हिस्टा या इमारतीतील पाचव्या मजल्यावर व्ही. टेक. साेल्युशन नावाने सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बोगस काॅल सेंटरवर सायबर क्राइम सेलच्या पथकाने शनिवारी छापा घातला. 


या काॅल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांना त्यांच्या अॅपल माेबाइल व अायपॅडवर येणाऱ्या सफारी बाऊझरवर (पीअाेपीयूपी) जनरेट करून त्यांचे डिव्हाइस क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत होते. तसेच ही समस्या साेडवण्यासाठी संबधितांना अॅपल ट्यून कार्ड खरेदी करण्यास लावून त्यांचा क्रमांक घेऊन लाखाे रुपयांची फसवणूक करण्यात अाल्याचे उघड झाले अाहे. अंदाजे १७५ अमेरिकन नागरिकांना एकूण दहा लाख ५० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी काॅल सेंटरचे भागीदार अादित्य काळे व राेहित माथूर (रा. पुणे) यांना अटक करण्यात आली अाहे. या  काॅल सेंटरमध्ये अमेरिकेतील अॅपल माेबाइल व अायपॅडचा वापर करणाऱ्या नागरिकांना ते वापर करताना बाऊजरवर  डिव्हाइसमध्ये एरर/सिस्टिम क्रॅश झाल्याचा मेसेज पाठवून त्यावर अॅडसेटर डाॅटकाॅममार्फत फाेन करण्यास भाग पाडले जात होते. त्यानंतर सदर काॅल सेंटरमधून अमेरिकन व्यक्तीस त्याची समस्या साेडवण्यासाठी अायट्यून कार्ड किंमत अंदाजे १०० यूएस डाॅलर विकत घेण्यास लावून त्या अायट्यून कार्डचा नंबर घेऊन त्यांना गंडा घालण्यात येत असे.  

बातम्या आणखी आहेत...