आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगावात या चौघांनी मारले राहुल फटांगडेला; शिवाजी महाराजांचे चित्र असलेला टी-शर्ट घातल्यानेच खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी राेजी दाेन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीदरम्यान राहुल बाबाजी फटांगडे (३०, रा.कान्हूर मसाई, ता.शिरूर, पुणे) या युवकाचा एका टाेळक्याने डाेक्यात दगड घालून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण खून केला हाेता. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र काढलेले असलेला टी-शर्ट घातल्यानेच राहुल फटांगडेचा खून करण्यात अाल्याची माहिती सीअायडीचे पाेलिस अधीक्षक प्रसाद अक्कानवरू यांनी दिली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिअाे सीअायडीकडून शुक्रवारी जारी करण्यात अाला अाहे. यातील चार अज्ञात मारेकऱ्यांची अाेळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांना पकडून देणाऱ्यास बक्षीस देण्याची घाेषणाही करण्यात अाली.  


काेरेगाव भीमा येथे विजय स्तंभास मानवंदना व शाैर्य दिवस साजरा करण्यासाठी १ जानेवारी राेजी माेठ्या प्रमाणात लाेकांनी गर्दी केली होती. त्या वेळी काेरेगाव भीमा ते सणसवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील पेट्राेल पंपाजवळ दाेन गटांत दगडफेक सुरू हाेती. याच रस्त्याने राहुल फटांगडे घरातील नळाच्या दुरुस्तीचे सामान अाणण्यासाठी जात हाेता. समाेर आलेल्या जमावातील काही तरुणांनी राहुल फटांगडेला झुडपात खेचून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. एका तरुणाने डाेक्यात दगड घालून त्याचा खून केला, असे चित्रण व्हिडिअाे क्लिपमध्ये दिसत अाहे. सीअायडीला एका व्यक्तीकडून संबंधित क्लिप मिळाली अाहे.

 

त्यात राहुल यास मारहाण करणाऱ्यांचे छायाचित्र व त्यांच्या हालचाली दिसून येत अाहेत. संबंधित ४ जणांची अाेळख पटवण्याचे काम पाेलिस करत असून त्यांची नावे, पत्ता माहिती असल्यास जवळील पाेलिस ठाण्यात अथवा सीअायडीला ९०४९६५०७८९  या क्रमांकावर माहिती द्यावी, असे अावाहन पोलिसांकडून करण्यात अाले अाहे.     

 

नगरच्या तीन अाराेपींविराेधात दाेषाराेपपत्र    
राहुल फटांगडे खूनप्रकरणी यापूर्वी पुणे ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तीन जणांची अाेळख पटवली. त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव येथून जानेवारी महिन्यात अटक करण्यात अाली. त्यांच्याविराेधात न्यायालयात नऊ एप्रिल राेजी दाेषाराेपपत्र दाखल करण्यात अाले अाहे. संबंधित तरुण घटनेच्या दिवशी ते काेरेगाव भीमा येथे अाले हाेते.

 

पुढील स्लाईडवर पहा,आरोपींचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...