आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार- राज ठाकरेंच्या महामुलाखतीचे विश्लेषण: पवारांचा पुरोगामी (!) पोवाडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

“जातनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याची भूमिका महाराष्ट्राला समजावून सांगावी लागेल,” असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला-समाजकारणाला नवी कलाटणी देणारं आहे. कोणी काही म्हणो...शरद पवारांनी राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीचे पडसाद राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ उमटत राहतील. राज यांच्या या एकाच प्रश्नानं आणि त्याला पवारांनी दिलेल्या उत्तरामुळं ही मुलाखत सत्कारणी लागली आहे. शिवसेना, संघ, भाजप, मनसे आणि शरद पवार यांच्यात आर्थिक निकषांवर आरक्षण या मुद्द्यावर एकमत झालंय. 'राष्ट्रवादी'च्या अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आदी नेत्यांना पवारांच्या मतापासून पळ काढता येणार नाही. उद्या 'राष्ट्रवादी'बरोबर आघाडी झालीच तर कॉंग्रेसलाही या मुद्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. 
 

 

गेल्या अडीच दशकांपासून महाराष्ट्रातला सर्वात मोठा जातसमूह मराठा आरक्षणाची मागणी करतोय. गेल्या दशकभरात या मागणीनं उग्र रुप धारण केलंय. गेल्या दीड वर्षात लाखा-लाखांचे मोर्चे इथं निघाले. त्यावरची प्रतिक्रिया म्हणून बहुजन मोर्चेही काढण्यात आले. फक्त मराठाच नव्हे आरक्षणासाठी धनगर, लिंगायत आदी जाती, पंथही आक्रमक होत आहेत. या सर्वांमध्ये मराठा आरक्षण हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. एकतीस-बत्तीस टक्के संख्येच्या या जातीला दुखावण्याचं धाडस कोणत्याच राजकीय पक्षात नाही. सत्तेत कोणताही पक्ष आला तरी तो मराठ्यांना नाराज करण्याची चूक करत नाही. म्हणून तर 2014 च्या लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारच्या राणे समितीनं मराठा आरक्षणाची शिफारस केली. तेव्हाच्या सरकारनं कायदेशीर बाबी न तपासताच ती मान्यही करुन टाकली. कारण मराठ्यांची भीती.

 

कायद्याच्या चौकटी न पाळता निव्वळ निवडणुकीतलं यश-अपयश डोळ्यापुढं ठेवून घेतलेला हा निर्णय अपेक्षेबरहुकूम कोर्टात उडवला गेलाच. मराठा आरक्षण लटकलं. तोवर भाजप-शिवसेनेचं देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आरुढ झालं होतं. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यानं मराठ्यांच्या तीव्र भावना गोंजरण्याखेरीज या सरकारच्या हातात फार काही उरलेलं नाही. कोर्टात अंतिमतः काय होणार, याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आणि विरोधातल्या पक्षांना आहे. आरक्षणाच्या आंदोलनांचं नेतृत्त्व करणाऱ्या मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही वस्तुस्थितीची पुरती कल्पना एव्हाना आलेली आहे. पण खरं बोलायला कोणीच तयार नाही. कारण एकच. मराठ्यांची भीती. सत्ताधारी आश्वासनं देत राहतात. बहुतेक मराठा जातीसंघटनांचं अस्तित्त्वच मुठभर मराठ्यांच्या भावना पेटवत राहण्यावर अवलंबून आहे. राजकारणाचा मुद्दा म्हणून (सत्तेत असताना काही करु न शकणारे) विरोधकही मराठ्यांना चेतवताहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राज ठाकरेंनी शरद पवारांच्या घेतलेल्या महामुलाखतीचे सुकृत करंदीकर यांनी केलेले विश्लेषण....

बातम्या आणखी आहेत...