आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात खेड तालुक्यात कळमोडी गावात बापाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खेड तालुक्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगुरुनगरमधील कळमोडी (ता.खेड) येथे 13 वर्षाच्या निरागस मुलीवर बापाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

 


मुलीची आई बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत या नराधम बापाने रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या मुलीला  झोपेतून उठवले. पप्पा मला झोप आली आहे, असे म्हणत ती पुन्हा झोपत असताना दोन्ही हात धरून तिला धान्य ठेवलेल्या खोलीत नेले. ओरडलीस तर मी तुझे तोंड दाबून मारून टाकीन, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत मुलीने आज आईच्या मदतीने खेड पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि नराधम बापाच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम बाप फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खेड तालुक्यातील पश्चिम भागात हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...