आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात रस्त्यात अडवून कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देत 25 वर्षीय महिलेवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खेड तालुक्यातील जऊळके बुद्रुक (ता खेड ) येथे ठाकर समाजातील 25 वर्ष वयाच्या विवाहितेला जीवे मारण्यांची धमकी देऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेने खेड पोलिस ठाण्यात  सचिन गोपीनाथ शिंदे (रा .अवसरी बु, ता .आंबेगांव ) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

 

 

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजता ही महिला पाचघर वस्ती ते खडी मशीन रस्त्यावरून जात होती. शिंदे याने या महिलेला रस्त्यात अडवुन बंद असलेल्या खडी मशीनच्या बाजुस नेऊन तिचे तोंड दाबुन जबरदस्तीने बलात्कार केला. घडलेल्या प्रकार कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या नवऱ्याला व मुलांना जीवे मारु अशी धमकी दिली. त्यानंतर काल रात्री पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपास पोलिस निरिक्षक प्रदीप जाधव करीत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...