आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YCM मध्ये 70 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून 8 इंचाचा गोळा काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स. - Divya Marathi
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स.

पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात अाजोबांच्या पोटातून चक्क 8 इंचाचा गोळा काढण्यात आला आहे. ही कामगिरी रुग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे. यात पूर्णपणे आजोबा बरे झाले असून तब्येत स्थिर आहे. बबन होळकर असे या 70 वर्षीय आजोबांचे नाव आहे.

 

 

होळकर यांची अचानक तब्येत अचानक बिघडल्याने 6 फेब्रुवारी रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पोटामध्ये काहीतरी असल्याने शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरविले, त्याप्रमाणे कुटुंबाला याची माहिती देऊन अडीच लाख रुपये खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु एवढी मोठी रक्कम आणायची कोठून हा प्रश्न होळकर कुटुंबापुढे होता. कुटुंबाने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्याचा उपाय सुचवला.

बबन होळकर यांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने त्यांच्यावर उपचार करत शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांपुढे ही शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आवाहन होते. तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया चालली. यानंतर बबन होळकर यांच्या पोटातून चक्क 8 इंचाचा गोळा काढण्यात आला. डॉ. संजय पाडाळे, हर्षल सोनवणे, आरती फुलारी, राजेश गोरे आणि डॉ.चव्हाण यांच्या टीमने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली आहे.यामुळे बबन होळकर या 70 वर्षीय आजोबांना जीवनदान मिळाले आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करण्याची गरज होळकर कुटुंबाला पडली नाही. ऑगस्ट महिन्यात अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करत महिलेच्या पोटातून 15 किलोचा गोळा काढला गेला होता. यावर तातडीने उपचार झाल्याने आजोबांचे प्राण वाचले आहेत. अशा आजाराचे प्रमाण फारच कमी आहे. आता आजोबांची तब्येत स्थिर आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सर्जन संजय पाडाळे यांनी दिली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...