आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगरावांचे निधन : मुख्यमंत्री म्हणाले, ते अजातशत्रू! पवारांचा ट्विटरद्वारे शोकसंदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पतंगराव कदम यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा लिलावती रुग्णालयात पतंगरावांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमाधून पतंगरावांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.   


देवेंद्र फडणवीस...
पतंगरावांच्या निधनाने एक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आपल्यातून निघून गेले आहेत. गावातून एसएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिलेच विद्यार्थी होते. शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज 5 ते 6 कि.मीचा प्रवास करावा लागत असे. आपल्या बालपणीच्या या व्यथांची आठवण ठेवत त्यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि प्रत्येक वंचिताला, गरजूला शिक्षण मिळावे, याची सोय केली. सहकार क्षेत्राची बांधणी करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते आणि ते सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कदम यांना श्रद्धांजली अर्पण केली. 


शरद पवार 
पवारांनी ट्वीट्स करत पतंगरावांना श्रद्धांजली अर्पण केली. पतंगराव कदम हे जवळपास पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक या नात्याने केली. शिक्षणसंस्था निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते आणि भारतीय विद्यापीठ या नावाने त्यांनी एक अभूतपूर्व शिक्षणसंस्था निर्माण केली. त्यात जवळपास चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही पतंगरावांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर त्यांनी विधिमंडळातही आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. शासनामध्ये प्रभावशाली मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा त्यांनी निर्माण केला. पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि व्यक्तिगत स्वरूपात मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, असे ट्वीट्स शरद पवारांनी केले. 


सुरेश कलमाडी
पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याची कधीही न भरून निघणारी अशी हानी झाली आहे. पतंगराव कदम हे मोठे नेते होते. ते राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे होते. पण तसे झाले नाही, हे महाराष्ट्राचेच दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांनी दिली आहे. कलमाडी यांनी सकाळी पतंगराव कदम यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतेले. 

 

पुढे पाहा, शरद पवारांनी केलेले ट्वीट्स... 

बातम्या आणखी आहेत...