आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे बाजीराव मस्तानीची खरी लव्हस्टोरी, हे होते मस्तानीचे खरे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- थोरले पेशवे बाजीराव यांची आज पुण्यतिथी आहे. बाजीराव आणि त्यांची दूसरी पत्नी मस्तानीची लव्हस्टोरी सिल्व्हर स्क्रीनवर येताच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. गेल्या वर्षी प्रदर्शीत झालेल्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटात दाखवलेल्या लव्हस्टोरीवरून मोठा वाद निर्माण झाला. परंतु, खऱ्या आयुष्यात बाजीराव आणि मस्तानीची भेट कशी झाली आणि त्यांची लव्हस्टोरी कशी पुढे गेली, याविषयी आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत आहोत.


मस्तानीचे खरे नाव कंचनी होते आणि ती बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल यांची कन्या होती. सन 1727-28 मध्ये मुस्लिम शासक मोहम्मद खान बंगशने महाराजा छत्रसालच्या राज्यावर हल्ला केला. राज्यावर संकट आलेले पाहून राजा छत्रसाल यांनी पेशवे बाजीराव यांना मदत करण्यासाठी एक गुप्त पत्र पाठवले. पत्र मिळताच पेशवे बाजीराव आपले सैन्य घेऊन मध्ये प्रदेशच्या छतरपूरमध्ये दाखल झाले आणि मोहम्मद खान बंगशच्या सैन्यावर हल्ला करून त्याला पराभूत केले.


पेशवे बाजीराव यांनी केलेल्या मदतीमुळे राजा छत्रसाल एवढे खुश झाले, की त्यांनी आपली कन्या मस्तानीचा हात बाजीराव यांच्या हातात सोपवला. पहिल्या भेटीतच बाजीराव आणि मस्तानी यांचे एकमेकांवर प्रेम जडले. पेशवे बाजीराव यांनी मस्तानीशी विवाह करून तिला आपली दुसरी पत्नी बनवले.

 

पुढील स्लाइडवर वाचा, हुंड्यात मिळाल्या होत्या हीऱ्यांच्या खाणी  आणि रणरागिनी होती मस्तानी....

बातम्या आणखी आहेत...