आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेजमध्ये रिसर्च विंगची उभारणी, DRDO च्या माध्यमातून संशाेधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतीय लष्कर, नाैदल अाणि वायुदलातील जवान वेगवेगळया वातावरणात प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. अतिउंच डाेंगररांगावर थंड प्रदेशात, वाळवंटात, खाेल समुद्रात, जंगली क्षेत्रात काम करीत असताना त्यांना शारिरिक क्षमता टिकवून ठेवत शत्रुला ताेंड द्यावे लागते. यादरम्यान, त्यांच्या अाराेग्याशी निगडीत अनेक प्रकारचे समस्या निर्माण हाेतात. जवानांची क्षमता वाढीसाठी संशाेधन करण्याकरिता याबाबतचे नमुने गाेळा करुन, संकलित माहितीच्या अाधारे विश्लेषण करण्यासाठी तसेच मिलिटरी मेडिसीन क्षेत्रातील संशाेधनास वाव देण्याकरिता लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयात रिसर्च विंगची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती अार्म्ड फाेर्सस मेडिकल सर्व्हिसेसचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 

पुरी म्हणाले, सियाचीन सारख्या अतिउंचावरील क्षेत्रात सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना रक्तदाब कमी हाेणे, अाॅक्सिजनची कमतरता भासणे, थंड वातावरणामुळे अाजार उदभवणे, उलटया हाेणे, मळमळणे, डाेकेदुखी हाेणे या समस्यांचा सामना करावा लागताे. तसेच लढाऊ विमानासह लांब पल्लयाचे माेहीमेवर जाताना पायलटला झाेप लागू नये, थकवा जाणवू नये याकरिता नवीन अाैषधांचे संशाेधन करण्यात येत अाहे. राेबाेटच्या मदतीने युध्दभूमीवर शस्त्रक्रिया करणे शक्य नसले तरी शांततेच्या काळात राेबाेटच्या मदतीने शस्त्रक्रिया कशाप्रकारे करता येऊ शकेल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत अाहे.

 

पुढील काळात, मुंबर्इ, पुणे अाणि बंगलाेर याठिकाणी राेबाेटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केंद्र सुविधा उपलब्ध केले जार्इल. युध्दभूमीवर जखमी सैनिकांना बाहेर काढण्याकरिता जवानांना जीव धाेक्यात घालावा लागताे. राेबाेटच्या मदतीने तातडीने सुरक्षितरित्या जखमी जवानांना हलविण्याकरिता राेबाेट महत्वपूर्ण भूमिका बजावू शकेल याकरिता डीअारडीअाेच्या माध्यमातून संशाेधन करण्यात येत अाहे.

 

एनएसजी, पॅरा कमांडाे, पाणबुडी, लढाऊ विमान अशा अतिधाेकादायक ठिकाणी काम करत असलेल्या सैनिकांचे डीएनए नमुने गाेळा करण्यात येत अाहे. अाग, विमान अपघात, बाॅम्ब हल्ला अशा दुर्घटनेत सैनिकांची अाेळख पटविणे जिकरीचे ठरते. याकरिता ‘हाय रिस्क झाेन’ मधील सात हजार सैनिकांचे डीएनए नमुने अातापर्यंत गाेळा करण्यात अाले असून यापुढील काळात तीन्ही दलातील सर्व जवानांचे डीएनए नमुने गाेळा करुन प्रयाेगशाळेत जतन केले जातील. अवयव प्रत्याराेपण व दान विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...