आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल, पेपरफुटीच्या अफवा पसरवल्यास कडक कारवाई: डॉ. शकुंतला काळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या निकालाच्या तारखांबाबत तसेच मंडळाच्या प्रश्नपत्रिका फुटण्यासंदर्भातील दिशाभूल करणाऱ्या कृती, याविरोधात सायबर सेलकडे यापूर्वीच तक्रारी दाखल आहेत. मात्र, अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात राज्य मंडळ कडक भूमिका घेणार असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी शुक्रवारी सांगितले.    


 दहावी, बारावी परीक्षांच्या निकालांविषयी सर्वांना उत्सुकता असते. एका सुनियोजित यंत्रणेद्वारा, अनुभवी तज्ज्ञांकरवी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळ निकालाची कार्यपद्धती राबवते. त्यासंबंधीच्या सूचना वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमांतून तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केल्या जातात. असे असतानाही निकालांविषयीच्या खोट्या तारखा, संकेतस्थळांची माहिती सोशल मीडियाद्वारा पसरवली जाते. त्यातून लक्षावधी विद्यार्थी, शिक्षक, पालक व अन्य संबंधित घटकांपर्यंत चुकीची माहिती पसरत आहे. तसेच प्रश्नपत्रिका फुटल्याची, व्हायरल झाल्याची अफवाही वारंवार पसरवली जात आहे. या साऱ्याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय मंडळाने आता घेतला असून त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलली जात आहेत, असे काळे यांनी स्पष्ट केले.    

 

गैरप्रकारांंचा तपास    
परीक्षा कालावधीत कॉपी, डमी उमेदवार आदी गैरप्रकार घडू नयेत, यासाठी राज्यभरात भरारी पथके नेमण्यात आली होती. यंदा राज्यात एकूण ६६१ कॉपी प्रकरणांची नोंद झाली, तर ६१७ निकाल डीबार झाले आहेत. राज्यात ६८८ निकाल राखून ठेवण्यात आले आहेत, असेही डॉ. शकुंतला काळे म्हणाल्या.

 

चित्रकला विषयात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी मिळवले जास्त गुण

शालेय वयापासून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विषयांसोबत एखाद्या कलेशी मैत्री करावी या हेतूने दोन वर्षांपूर्वीपासून कला आणि क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तेजन म्हणून गुण देण्याची पद्धत सुरू करण्यात आली. यंदा दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी या गुणांचा लाभ घेतला असल्याचे चित्र निकालातील आकडेवारीतून पुढे येत आहे.  तब्बल १ लाख १६ हजार २१ विद्यार्थ्यांनी चित्रकलेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. क्रीडा नैपुण्य सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शासन निर्णयानुसार अतिरिक्त क्रीडा गुण दिले जातात.  कला विषयांत विद्यार्थ्यांना शास्त्रीय गायन, वादन, नृत्य, लोककला आणि चित्रकला असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वर्षी विद्यार्थ्यांनी चित्रकलेला सर्वाधिक पसंती दिली आहे.  तर नाटक हा कला प्रकार सर्वात कमी विद्यार्थ्यांनी हाताळला आहे. 

 

 पुढील स्लाईडवर पहा,कलेप्रति असा आहे विद्यार्थ्यांचा कल.....

 

 

बातम्या आणखी आहेत...