आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीचा ‘मेकॅनिक्स’ पेपर फुटल्याची अफवाच; दोषींवर कारवाई विद्यापीठाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा बुधवारी झालेला ‘इंजिनिअरिंग मेकॅनिक्स’ हा पेपर फुटला नसल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. 


याबाबत काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केल्याची शक्यता असून यासंदर्भात आवश्यकता भासल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाला असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

 
अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा बुधवारी असलेला ‘इंजिनिअरिंग मेकॅनिक्स’ हा पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे आली. हा प्रकार पौड रस्त्यावरील एमआयटी कॉलेजमध्ये घडल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. याबाबत माहिती घेण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आपले पथक एमआयटी महाविद्यालयात पाठवले. या पथकाने केलेल्या चौकशीत असे आढळले की, हा पेपर फुटलेला नाही. परीक्षा १० वाजता सुरू झाल्यानंतर कोणी तरी मोबाइलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते बाहेर पाठवून दिले. त्यानंतर हा पेपर व्हायरल झाला. त्यानंतर पेपर फुटला असल्याची अफवा पसरली.   

 

२ प्रश्नपत्रिका जुन्याच   
काही क्लासचालकांनी परीक्षा विभागाला पेपर फुटल्याच्या नावाखाली ३ प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. त्यापैकी २ प्रश्नपत्रिका २०१४ व २०१७ या वर्षातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसरी प्रश्नपत्रिका बुधवारच्या पेपरची होती. त्याच्यावर वॉटरमार्क आहेत. त्यावरून हा पेपर कॉलेजने परीक्षेपूर्वी केवळ अर्धा तास आधी डाऊनलोड केल्याचे स्पष्ट होते.  

बातम्या आणखी आहेत...