आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- यंदाचा पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती ‘सारं काही समष्टीसाठी’ सोहळा १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ अार्ट्समध्ये रंगणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना ढसाळ स्मृती समष्टी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, तर समष्टीचा विशेष गोलपिठा युवा पुरस्कार कवी सुदाम राठोड यांना प्रदान केला जाणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता अभिनेत्री स्वरा भास्कर, लेखक किरण नगरकर, पत्रकार मंदार फणसे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ढसाळ लिटरेचर फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या या समारोहाची जय्यत तयारी सुरू असून या कार्यक्रमात अभिनेता झिशान अय्युब, रसिका आगाशे यांच्यासह अनेक कलावंत आपली कला सादर करणार आहेत. दुपारी १२ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत हा सोहळा रंगणार आहे.
सकाळच्या सत्रात सविता प्रशांत यांची ‘मसणवाटा’ तर सूरज मौर्य यांच्या ‘सायकल’ या लघुपटाचे सादरीकरण हाेणार अाहे. यानंतर मीनाक्षी राठोड यांच्या बंजारा होळीचे तर कैलास वाघमारे यांच्या वगनाट्याचे प्रस्तुतीकरण होणार आहे. दुपारच्या सत्रात पँथर चळवळीचे बदलते स्वरूप या विषयावर आतिश बनसोडे, वैद्यकीय क्षेत्र आणि उच्च शिक्षण या विषयावर डॉ. आकाश वाघमारे संवाद साधतील. तर आगामी काळातील स्त्री नेतृत्वावर नेहाली व सुषमा संवाद साधतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.