आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला बजरंग दल कार्यकर्त्यांकडून मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काॅ. गाेविंद पानसरे लिखित ‘शिवाजी काेण हाेता?’ या पुस्तकाच्या प्रतींचे मंचर येथील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते शरद पाेखरकर यांनी माध्यमिक शाळेत माेफत वाटप केले हाेते. सदर पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने ते पुस्तक वाटण्यास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा विराेध हाेता. या कारणावरून रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाेखरकर यांच्या घरात बजरंग दलाचे ५० कार्यकर्ते आले. त्यानंतर त्यांनी पाेखरकर यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पाेखरकर यांनी मंचर पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बजरंग दलाचे अवसरी खुर्द येथील कार्यकर्ते संजय भास्कर शिंदे, स्वप्निल अशाेक शिंदे, स्वप्निल कुशाबा भाेर, राेहित ढुमणे यांच्यासह सुमारे ५० जणांविराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे.  

  
याप्रकरणी प्रकाश किसन शिंदे, वैभव दत्तात्रय शिंदे यांच्यासह चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात अाली अाहे. साेमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालीन काेठडी सुनावण्यात आली. पाेखरकर हे मंचरमधील अष्टविनायक काॅम्प्लेक्स येथे दुसऱ्या मजल्यावर राहत असून राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संघटक व मराठा क्रांती माेर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक याच्यासह संभाजी ब्रिगेडचे ते काम करतात. पाेखरकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मंचरमधील माध्यमिक शाळेत काॅ. गाेविंद पानसरे लिखित ‘शिवाजी काेण हाेता?’ या पुस्तकाच्या प्रती माेफत वाटप केल्या हाेत्या. या कारणावरून बजरंग दलाचे कार्यकर्ते चिडले हाेते. 


रविवारी रात्री शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाेखरकर यांना भेटावयाचे अाहे, असे फाेनवर सांगून बजरंग दलाचे सुमारे ५० कार्यकर्ते त्यांच्या घरी अाले. त्यांनी पाेखरकर यांना शाळांमध्ये पुस्तकाचे वाटप का केले, अशी विचारणा करत जाब विचारल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पाेखरकर यांना फ्लॅटमध्ये मारहाण करण्यात अाली. यामध्ये पाेखरकर यांच्या पाठीवर अाणि डाेळ्यावर मारहाणीचे व्रण उमटले. भांडणे साेडवण्यासाठी आलेल्या अमाेल अनंत शेलार व गणेश भिकाजी बांगर या दाेघांनाही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पाेलिस घटनास्थळी दाखल हाेताच सर्वजण पळून गेले. मारहाणीच्या वेळी पाेखरकर यांचे मित्राच्या गळ्यातील चार ताेळ्याची साेन्याची चेन हरवली आहे. पाेलिसांनी कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

 

गैरसमजातून वाद चिघळला   
मंचर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी सांगितले की, शरद पाेखरकर हे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ संघटनेचे संघटक म्हणून काम करतात. नियमितपणे ते पुस्तके वाटप करतात व त्यावर काेणतीही बंदी असण्याचा प्रश्न नाही. मात्र, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने त्यावर अाक्षेप घेतला. याप्रकरणी दाेन्ही विचारधारेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर पाेखरकर यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना भडकाऊ मेसेज पाठवला अाणि त्यानंतर दाेघांमध्ये गैरसमज हाेऊन वाद चिघळला. पाेलिस याप्रकरणी इतर अाराेपींचा शाेध घेत अाहे.

बातम्या आणखी आहेत...