आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात नृत्यविषयक चित्रपटांचा ‘संचारी’ महोत्सव; दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पारंपरिक नृत्यकला हा सर्वांच्याच आवडीचा विषय. ही कला चित्रपटांच्या माध्यमातूनदेखील रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने “लाऊड अॅपलॉज डान्स मॅगझिन’ आणि ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या वतीने ‘संचारी’ या नृत्यविषयक चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ व ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सकाळी ११ वाजल्यापासून हा महोत्सव होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.  


चित्रपट महोत्सवाविषयी बोलताना कथ्थक नृत्यांगना आणि “लाऊड अॅपलॉज डान्स मॅगझिन’च्या नेहा मुथियान म्हणाल्या की, नृत्याचा अाविष्कार आपण अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनुभवत असतो. नृत्याचे अनेकविध पैलू उलगडून दाखवणारे नृत्यविषयक चित्रपट, माहितीपट यांची नवीन येणाऱ्या कलाकारांच्या पिढीला माहिती व्हावी, त्यांच्यापर्यंत हे चित्रपट पोहोचावेत या उद्देशाने नृत्यविषयक चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन आम्ही केले आहे. प्रसिद्ध कला इतिहासतज्ज्ञ, नृत्य समीक्षक, लेखक आणि मोहन खोकर तसेच आशिष खोकर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या विशेष सहकार्याने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक जुन्या चित्रपटांबरोबर कलाकारांवरील चित्रपट आणि माहितीपटांचा समावेश या महोत्सवात असेल. या महोत्सवात दाखवण्यात येणारे सर्व चित्रपट हे मोहन खोकर डान्स अर्काइव्ह, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फिल्म डिव्हिजन यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व चित्रपटांचा उपयोग नवीन पिढीला होईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे मत या वेळी कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव व भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी व्यक्त केले.  

 

असा असेल नृत्यचित्रपट महोत्सव  
‘लास्य काव्या’ हा आंतरराष्ट्रीय भरतनाट्यम नृत्यांगना अलरमेल वल्ली यांच्यावरील संकल्प मेश्राम यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट  संजू सुरेंद्रन दिग्दर्शित “कपिला’  जी. अरविंदन दिग्दर्शित ‘मरट्टम’  ‘डान्स इन फिल्म्स, फिल्म इन डान्स’ हा आशिष खोकर यांनी संकलित केलेला व ज्येष्ठ कलाकार उदय शंकर, राम गोपाल आणि साधना बोस यांच्या कलेची झलक दाखवणारा चित्रपट

बातम्या आणखी आहेत...