आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर म्हणाले होते की, 6 महिने जिवंत राहतील पवार, पत्नीसमोर ठेवली अजब अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवार. - Divya Marathi
सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवार.

मुंबई/पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रमुख पद्म विभूषण शरद पवार यांचा आज 77 वा जन्मदिवस आहे. ते आपल्या जन्मदिवस असतानाच नागपूरात आंदोलन करत आहेत. सुमारे 32 वर्षानंतर ते आंदोलन करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरत आहेत. माजी केंद्रीय मंत्री असलेले पवार हे महाराष्ट्राचे सगळ्यात कमी वयाचे मुख्यमंत्री होते. त्यांनी कर्करोगावर केलेली मात नेहमीच अनेकांना प्रेरणा देते. त्याच्या जीवनात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांना डॉक्टरांनी सगळी आवश्यक कामे उरकुन घेण्यास सांगितले होते. कारण त्यांना त्याच्याजवळ केवळ 6 महिन्याचा कालावधी उरला असल्याचे सांगण्यात आले होते. 

 

हे होते पवारांचे उत्तर
- एका कार्यक्रमात पवारांनी सांगितले की, 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांना कर्करोग झाल्याचे समजले.
- त्यानंतर ते उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले. तेथे त्यांना भारतातील काही तज्ञांकडे जाण्यास सांगण्यात आले. 

- कृषीमंत्री असताना त्यांनी 36 वेळा क्ष-किरणांचे उपचार घेतले. ते अतिशय त्रासदायक असल्याचे सांगण्यात येते. - या काळात पवार हे सकाळी 9 ते 2 या वेळेत काम करायचे आणि दुपारी अडीच नंतर अपोलो हॉस्पीटलमध्ये केमोथेरपी घेत होते. 

- त्यांना केमोथेरपीचा इतका त्रास होत होता की त्यांना घरी गेल्यावर थेट झोपावे लागत होते. या काळात त्यांना एका डॉक्टराने त्यांना तुम्ही केवळ सहा महिने जगाल असे सांगितले.

- त्यावर पवारांनी त्यांना उत्तर दिले की मी आजाराची चिंता करत नाही, तुम्हीही करु नका.

- पवार नेहमी सांगतात की, कॅन्सरपासून दुर राहण्यासाठी तंबाखुपासून दुर राहा. 

 

पत्नीसमोर ठेवली होती ही अट
- शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितले की, लग्नापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीसमोर एक अट ठेवली होती. ती म्हणजे एकच मुल होऊ देण्याची.

- ते म्हणाले होते की, आमचे एकच मुल असेल ते मुलगा असेल अथवा मुलगी. त्यानंतर 30 जून 1969 रोजी सुप्रिया यांचा पुण्यात जन्म झाला.
- 44 वर्षांपूर्वी असा निर्णय घेणे खूपच अवघड होते. पण त्यांनी हे करुन दाखवले.

- अशा कुटुंबात जन्म घेतल्याने सुप्रिया यांना लहानपणापासूनच आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले.
- कुटुंबाकडून त्यांच्यावर कधीच कुठला दवाब नव्हता. मग ते शिक्षण असो की लग्न.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...