आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक अारक्षणावर संघ, ठाकरे, पवारांचेही एकमत; जातीय विद्वेष संपायला हवा: पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘जातनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याची भूमिका महाराष्ट्राला समजावून सांगावी लागेल,’ अशी भूमिका स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी दिली आहे. 


मराठा, धनगर, लिंगायत आदींच्या आरक्षणाची मागणी आणि विविध मोर्चांमुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघालेले असताना पवारांनी जातीनिहाय विचार टाळण्याचा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम मांडलेला आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढे नेलेला विचार नव्याने महाराष्ट्रापुढे ठेवला. तुमच्यासमोरची सर्वात मोठी चिंता कोणती, या प्रश्नावर ‘महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य,’ असे उत्तर देत पवारांनी मराठीजनांमध्ये विद्वेष वाढत चालल्याची टिप्पणी केली. ‘जात, धर्म, भाषा यातून समाजात पडणारे अंतर, कटुता घालवावी लागेल. सामाजिक ऐक्य वाढवण्याच्या दिशेने पावले टाकावी लागतील,’ असे पवार म्हणाले. रोखठोक आणि थेट बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळपास १ तास ५५ मिनिटे पवारांशी संवाद साधत अनेक गंभीर मुद्द्यांवर पवारांना बोलते केले. राजच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना पवारांना सावध व्हावे लागले तर काही प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी राज यांची फिरकी घेतली. इतिहास, वर्तमान आणि भविष्याभोवती फिरणारी ही मुलाखत राज्य व देशापुढच्या अनेक संवेदनशील प्रश्नांना वाचा फोडणारी ठरली. 

 

बिघडलेले ऐक्य चिंतेचा विषय...
तुमच्या दृष्टीने सर्वात चिंतेचा विषय कोणता या राज यांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘बिघडलेले सामाजिक ऐक्य हा चिंतेचा विषय आहे. विद्वेष वाढतो आहे. राजकीय अभिनिवेष न ठेवता या मुद्द्यावर सर्वांनी काम केले पाहिजे. जात, धर्म, भाषा यामुळे वाढलेले अंतर, कटुता दूर केली पाहिजे. ऐक्य निर्माण करण्याच्या दिशेने पावले टाकली पाहिजेत.’

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...