आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांच्या गुगलीवर पवार षटकार ठोकणार का?; पुण्यात सोहळ्यास सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महामुलाखत मनसेप्रमुख राज ठाकरे आज घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजता पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बीएमसीसीच्या मैदानावर हा संवाद रंगेल. दोन दिग्गजांच्या या महामुलाखातीसाठी राज्यभरातून रसिक चाहते पुण्यात दाखल झाले आहेत.

 

आजची ही मुलाखत कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारधारेशी संबंधित नसून, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, भाषा, समाजकारण, राजकारण आदी विषयांशी निगडित असणार आहे.

 

या मुलाखतीआधी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शरद पवारांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

यासोबतच चंदू बोर्डे, नागराज मंजुळे, विलास रकटे, संदीप वासलेकर, डॉ. पी. डी. पाटील, लीला गांधी, विलास रकटे, बीव्हीजीचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

 

सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या भारती विद्यापीठाचा सत्कार डॉ. विश्वजित कदम स्वीकारतील. तसेच नॅशनल फिल्म अॅवॉर्डमध्ये सुवर्ण कमळ विजेत्या कासव चित्रपटाच्या टीमचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांची महामुलाखत घेतील अशी माहिती ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी माहिती दिली आहे.  

बातम्या आणखी आहेत...