आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार- राज ठाकरेंच्या मुलाखतीचा योग अखेरीस 21 फेब्रुवारीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘मुक्त संवाद दोन पिढ्यांचा’ या शीर्षकांतर्गत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता २१ फेब्रुवारीला घेणार आहेत. यापूर्वी दोन वेळा या बहुप्रतीक्षित बहुचर्चित मुलाखतीचा मुहूर्त हुकला होता. पवार ज्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत त्या बीएमसीसीच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता पवार  -ठाकरे संवाद होणार आहे. या वेळी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कराने गौरवण्यात येणार आहे.  कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांचे नेते, खासदार, आमदार मंडळी या उपस्थित राहणार आहेत.   


जागतिक मराठी अकादमीतर्फे ‘शोध मराठी मनाचा’ हे संमेलन नुकतेच झाले. त्यामध्ये या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरेगाव भीमा प्रकरण घडल्याने हा संवाद पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर ठरवलेली तारीख संसद अधिवेशनामुळे पुन्हा हुकली. आता २१ फेब्रुवारीला पुन्हा जुळवाजुळव करून कार्यक्रम ठरवण्यात आल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शनिवारी येथे दिली. 

बातम्या आणखी आहेत...