आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांना शेवाळकर स्मृती पुरस्कार जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या व साहित्य क्षेत्रावर आपल्या लेखनाची नाममुद्रा उमटवणाऱ्या सर्जनशील लेखन करणाऱ्या व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने पहिला ‘साहित्यव्रती पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ही माहिती दिली. हा पुरस्कार शेवाळकर कुटुंबीयांनी प्रायोजित केल्याचे ते म्हणाले. परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालणाऱ्या मूल्यदृष्टीचे लेखन बगे चाळीस वर्षे करत आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारांनीही त्या सन्मानित आहेत. कथा, कादंबरी आणि ललित लेखन अशा क्षेत्रात लेखन मुशाफिरी करणाऱ्या आशा बगे यांच्या नऊ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह आणि ललित लेखन रसिकप्रिय आहे. मराठी साहित्याचे क्षेत्र त्यांनी आपल्या लेखनाचे समृद्ध केले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचे अनुवाद हिंदी, बंगाली, कन्नड, मल्याळम आदी भाषांतही झाले आहेत.  
बातम्या आणखी आहेत...