आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती: चला तर मग छत्रपतींची राजधानी रायगड किल्ल्याच्या सफरीवर....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगडावरील एक बुरुज - Divya Marathi
रायगडावरील एक बुरुज

पुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांची 388 वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. जगातील थोर राजांपैकी एक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या स्‍वराज्‍याची राजधानी रायगड किल्‍ला होता. याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर, याच किल्‍ल्‍यावर शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्‍यामुळे या किल्‍लाला अनन्य साधारण महत्‍त्‍व आहे. हा किल्‍ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पाय-या आहेत. महाराजांनी रायगडालाच का दिला राजधानीचा दर्जा....

 

- शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला होता.
- पुढे एका महिन्‍यानंतर हा किल्‍ला महाराजांच्या ताब्यात आला.
- तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली.
- त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला.
- त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
-रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणा-या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे.

- सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

 

रायगडाचे प्राचिन नाव काय-

 

- रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते.
- युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत.
- जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम.
- पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता
- त्‍याकाळी त्‍याला ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती.
- त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्याला ‘नंदादीप’ असेही नाव पडले.

 

निजामशाहीत रायगडाचा यासाठी होत होता उपयोग-

 

- निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.
- मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला.
- महाराष्‍ट्रातील हा एक महत्‍त्‍वाचा किल्‍ला आहे.
- हा किल्‍ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून, समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर (2700 फूट) उंचीवर आहे.
- गडावर पोहोचायला जवळ-जवळ 1400-1450 पाय-या आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा व पाहा, या किल्ल्याशी संबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...