आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे होते शिवाजी महाराजांचे सैन्‍य व्‍यवस्‍थापन, कसा हाकला जायचा राज्य कारभार, घ्या जाणून...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी (19 फेब्रवारी) जयंती आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आदराचे आणि भक्तीचे उत्तुंग असे स्थान आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवछत्रपतींबद्दल अतीव अभिमान भरलेला आहे. शिवाजी राजांच्या युद्धनीतीमुळे त्यांना जागतिक पातळीवरही मान्यता मिळाली. पण, त्‍यांचे सैन्‍य व्‍यवस्‍थापन कसे होते, ते कोणती युद्ध नीती वापरत, त्‍यांचे प्रशासन कसे चले याची खास माहिती केवळ divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

 

शिवाजी महाराजांची युद्धनीती वापरून व्हिएतनामने हरवले बलाढ्य अमेरिकेला-

 

- जेव्हा शत्रू बलाढ्य असतो आणि तो त्याला फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात युद्धासाठी उतरतो तेव्हा त्याला नामोहरम करण्यासाठी गनिमी कावा कसा वापरावा याचा आदर्श छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या युद्धतंत्रामुळे निर्माण केला.
- व्हिएतनाममध्ये अमेरिकेची बलाढ्य सेना उतरल्यावर तेथील जनतेचे लोकनेते हो चि मिन्ह यांनी शिवाजी राजांचे ‘गोरिला वॉरफेअर' तंत्र वापरले. 
- विश्वविजयी अमेरिकी सेनेला अखेर व्हिएतनाममधून नामुष्कीची माघार घ्यावी लागली. अनेक इंग्रज इतिहासकारांनी शिवछत्रपतींच्या युद्धतंत्राची तुलना हानिबल, ज्युलियस सिझर, नेपोलियन यांच्याशी केली आहे.

 

शिवाजींनी उभारले भारतातील पहिले आरमार-

 

- भारतात सागरी बळ वाढविण्याची दृष्टी शिवछत्रपतींकडे होती. त्यामुळेच त्यांनी कोकण किना-यावर सिंधुदूर्गसारखे सागरदुर्ग बांधले आणि पहिल्या भारतीय आरमाराची उभारणी केली होती.

 

कशावर आधारित होते महाराजांचे प्रशासन-

 

- शिवाजी महाराजांनी त्‍यांच्‍या समकालीन राज्‍यवस्‍थेचा अभ्‍यास करून, त्‍यांच्‍या उणिवा शोधून स्‍वराज्‍याची स्‍थापना केली.

- शिवाजी महाराज स्‍वत:च स्‍वराज्‍याचे मुख्‍य प्रशासक होते. त्‍यांची शासन व्यवस्था प्रचलित मुस्‍लीम शासन व्यवस्था आणि भारतीय नीतीशास्त्र यांवर आधारलेली होती.

 

पुढील स्‍लाईडवर वाचा, स्‍वराज्‍याचे होते सात प्रमुख विभाग...कसे काम चालायचे अष्‍टप्रधान मंडळाचे....

बातम्या आणखी आहेत...