आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांसह असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्माेत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर (जि. पुणे) साेमवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजन्माेत्सव साेहळा उत्साहात पार पडला.    


मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनाेद तावडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, अामदार शरद साेनवणे, विभागीय अायुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पाेलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी साैरभ राव, पुणे ग्रामीण पाेलिस अधीक्षक सुवेज हक अादींनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. गडावर अागमन हाेताच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात अाले. त्यानंतर पाच सुवासिनींनी सजवलेल्या पाळण्यात बालशिवाजींच्या मूर्तीला जाेजवून पाळणा गीत म्हटले. प्रशासनाच्या वतीने शिवनेरी गडावर माेठी तयारी करण्यात अाली हाेती. या वेळी गडावर साहसी खेळांची प्रात्यक्षिके शिवप्रेमींनी सादर केली. शिवनेरी गड फुलांच्या माळा अाणि अाकर्षक रांगाेळया काढून तसेच भगवे झेंडे लावून सुशाेभित करण्यात अाला हाेता.    

गडावर घोषणाबाजी   
शिवनेरी गडावर दुसऱ्या संघटनेतर्फे अायाेजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली नाही. ते ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’साठी मुंबईला गेले. यानंतर काहींनी सरकारविराेधी घोषणाबाजी केली. विनोद तावडे व  पंकजा मुंडे यांनी अांदाेलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही काही तरुणांची घाेषणाबाजी सुरूच हाेती.  


प्रवेशासाठी हुल्लडबाजी   
सन २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हेलिकॉप्टरवर शिवनेरीत दगडफेक केली होती. तेव्हापासून दरवर्षी जन्माेत्सवाच्या वेळी  सुरक्षा कडक केली जाते. सकाळी मोजक्याच लोकांना गडावर सोडले जाते. सकाळी दहानंतर मात्र सर्वांनाच मुक्त प्रवेश दिला जाताे. मात्र तत्पूर्वीच गडावर जाण्यासाठी काहींनी पाेलिसांचा विराेध डावलून हुल्लडबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...