आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून अाकाशात झेप घेत स्कायडायव्हिंग या साहसी खेळात नवनवीन विक्रम करणाऱ्या पुण्याच्या शीतल महाजनने आणखी एक पराक्रम केला आहे. शीतलने महाराष्ट्रातील संस्कृतीचे प्रतीक असलेल्या नऊवारी साडीचा पेहराव करून थायलंडमध्ये तब्बल १३ हजार फुटांवरून स्काय डायव्हिंग जम्प केली अाहे. मराठी असल्याचा अभिमान असून मराठी संस्कृतीचे नाव अांतरराष्ट्रीय पातळीवर पाेहचावे याकरिता मला छाेटासा प्रयत्न करता अाल्याची भावना पद्मश्री सन्मानप्राप्त शीतलने व्यक्त केली.
मराठी बाण्याचा नऊवारीतून संदेश
मराठी बाण्याचा संदेश जगभर देण्यासाठी शीतलने नऊवारीची वेशभूषा निवडली. ८.२५ मीटर नऊवारी घालून स्काय डायव्हिंग शक्य आहे का, याचीही पडताळणी केली. नऊवारीचा रुबाब वेगळाच असल्याने हा प्रकार निवडल्याचे त्या सांगतात.
अर्ज-विनंत्यांनंतर परवानगी
स्काय डायव्हिंगसाठी विशिष्ट सूट असतो. आजवर कुणीही साडी घालून ते केलेले नाही. मात्र शीतल यांनी थायलंडच्या स्काय डायव्हिंग सेंटरमध्ये अर्ज करून तशी परवानगी मिळवली.
खास साडी तयार करून घेतली
या उडीसाठी विशेष नऊवारीची शिलाई करून घेतली. साडी घालून स्काय डायव्हिंग करणे अवघड असते. अाकाशात वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने साडी उडून जाण्याचा धोका होता. त्यामुळे साडी चोपून घट्ट बसावी याकरिता माेठ्या प्रमाणात पिनअप तसेच चिकटपट्टीचा वापर केला.
साडीत दाेन वेळेस स्काय डायव्हिंग
शीतल म्हणाली, अातापर्यंत नऊवारी साडी घालून काेणी स्काय डायव्हिंग केलेले नाही. असे साहस करणे अभिमानास्पद हाेते. महाराष्ट्राकरिता नऊवारी साडीत मी दोन स्काय डायव्हिंग जम्प करण्याचा संकल्प पूर्ण केल्याचे समाधान अाहे. अातापर्यंत माझ्या एकूण ७०५ स्काय डायव्हिंग जम्प पूर्ण झालेल्या अाहेत.
१७ राष्ट्रीय, ६ जागतिक विक्रम
पद्मश्री शीतल महाजनने स्काय डायव्हिंग या साहसी खेळात अातापर्यंत १७ राष्ट्रीय अाणि ६ जागतिक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. अशी कामगिरी करणारी स्काय डायव्हिंग क्षेत्रातील पहिलीच महिला खेळाडू अाहे.
पुढील स्लाइडवर पाहा, आणखी फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.