आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहू फुलेंचा अभिमान म्हणून फुले पगडीचा आग्रह धरला; शरद पवार यांचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मी पुण्यात वाढलो आहे, याचा मला अभिमान आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे माझे आदर्श आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मी फुले पगडीचा आग्रह धरला. मात्र यातून कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिले. या पगडी प्रकारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.   


पुणे महानगरपालिकेच्या वतीने डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटर आणि स्वामी विवेकानंद भित्तिचित्रांच्या उद््घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, कामगार नेते बाबा आढाव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.   


पवार म्हणाले, सातारा आणि कोल्हापूर येथे छत्रपती आहेत. छत्रपती हे एकच असतात. त्यामुळे ती पगडी वापरता येत नाही. डॉ आंबेडकर यांनी परदेशी हॅट वापरली असली तरी रोजच्या आयुष्यात ते टोपी वापरत नव्हते. त्यामुळे समतेचा आणि विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा फुले यांचे पागोटे घालण्यात यावे, अशी माझी इच्छा होती. जीवनात शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श असून त्यांचे विचार आणि जीवन मी नेहमी मांडण्याचा प्रयत्न करत असतो.

 

बातम्या आणखी आहेत...