आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठ्या घुमटाकार प्रार्थनास्थळी 54 महामानवांचे पुतळे; प्रजासत्ताकदिनी कळसारोहण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीने पुण्याजवळील विश्वराजबाग लोणी काळभोर येथे विश्वशांती आणि मानवतेचे प्रतीक म्हणून उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या  घुमटाकार प्रार्थना सभागृहाचा कळसाराेहण समारंभ २६ जानेवारी राेजी अायाेजित करण्यात अाला अाहे.  त्याला संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती प्रार्थना सभागृह असे नाव देण्यात अाले अाहे. विश्वकल्याणाचे महान कार्य करणारे संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांच्या भव्य ५४ पुतळ्यांचा त्यात समावेश अाहे.  


या सोहळ्यासाठी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, झोरास्ट्रीयन, ज्यू अशा विविध धर्मांतील गाढे अभ्यासक व विद्वान असे पं. वसंत गाडगीळ, अनिस चिस्ती, डॉ. एडिसन सामराज, सरदार राजिंदरसिंग कंडा, भंते नागघोष, पंढरपूरचे वा. ना. उत्पात, बाळासाहेब बडवे आणि निष्ठावंत वारकरी व  समाजसेवक तुळशीराम कराड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...