आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- महाराष्ट्र राज्य लाेकसेवा अायाेग (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातून शिक्षणासाठी पुण्यात अालेल्या सुमारे अाठ हजार विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी पुण्यातील शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान माेर्चा काढला. एमपीएससी परीक्षेच्या बाबत वेगवेगळया मागण्या पूर्ण कराव्यात याबाबतचे निवेदन विद्यार्थ्यांच्या समन्वयक समितीने दिले.
विद्यार्थी माेर्चा समितीचे प्रतिनिधी शरद चव्हाण म्हणाले, उपजिल्हाधिकारी ते पीएसअायसाठी एकच संयुक्त परीक्षा पद्धत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत अाहे. राज्यात वर्ग एक व वर्ग दाेनच्या सुमारे ४५ हजार जागा रिक्त असताना एमपीएससीने केवळ ६९ पदांची जाहिरात काढली अाहे. वर्ग एक ते वर्ग चारच्या पदांचा विचार करता राज्यात एक लाख ७७ हजार जागा रिक्त असून कामाचा माेठा ताण प्रशासनावर येत अाहे. त्याचवेळी परीक्षांची हजाराे विद्यार्थी तयारी करत असून जागांची संख्या कमी असल्याने अनेक उमेदवार बेरोजगार होत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.