आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीत एकाची नैराश्यातून आत्महत्या; दोन वेळा झाला होता अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- पिंपरीतील खराळवाडी येथे नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नारायण ढमाले असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ढमाले यांचा दोन वेळा अपघात झालेला होता. अपघाता नंतर त्‍यांच्‍या पायाला गंभीर दुखापत झाल्‍याने ते घरातच होते.  


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,तीन वर्षांपूर्वी नारायण ढमाले वय-४५ रा.खराळवाडी यांचा दोन वेळा अपघात झाला होता, अपघातात त्यांचा पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांच्या दोन्ही पायात लोखंडी रॉड टाकण्यात आले होते. यामुळे त्यांना घरीच बसून राहावं लागायच, ढमाले यांच्या पाठीमागे पत्नी आणि दोन मुली आहेत. पत्नी ही खाजगी नोकरीस आहे तर दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत. त्यामुळे नारायण ढमाले हे घरात एकटेच असायचे. नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात कोणी नसताना ढमाले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळेतून मुली घरी आल्या मात्र वडील दार उघडत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा हा सर्व प्रकार समजला. ते भावासोबत सरफेस पेंटिंगचा व्यवसाय करायचे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...