आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेजुरीत सुप्रिया सुळेंकडून 40 किलोंचा खंडा उचलण्याचा प्रयत्न; दर्शनासाठी गडावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी गडावर खंडेरायाची 40 किलो वजनाची तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे कुलदैवत अशी ख्याती असलेल्या जेजुरीगडावरील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी चक्क 40 किलो वजनाचा खंडा (तलवार) उचलून सर्वांना चकित केले.

 


हा खंडा सरदार पानसे यांनी देवाला वाहिला आहे. महाशिवरात्रीला गडावरील दोन्ही शिवलिंग दर्शनासाठी खुले असतात. यावेळी सुप्रिया सुळेंनी भविकांबरोबर सेल्फीही घेतले.
महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य मंदिरातील तळघरात असलेले गुप्त शिवलिंग तसेच कळसावरील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. यासाठी राज्यभरातून भाविक जेजुरीला येत असतात. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...