आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट कॅन्सर पीडितांना मोफत उपचार मिळावेत यासाठी सुप्रिया सुळेंचे संसदेत खासगी विधेयक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती आणि उपचार यासाठी खासगी विधेयक लोकसभेत सादर केले आहे. सुप्रिया सुळेंनी या विधेयकाला ‘ब्रेस्ट कॅन्सर कायदा’ असे नाव दिले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त महिलेला सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळाले पाहिजेत अशी मागणी केली आहे.

 

 

विधेयकाची वैशिष्टये

-  हा कायदा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू असेल
- केंद्र सरकार ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती करेल
- ‘ब्रेस्ट कॅन्सर’चे निदान करण्यासाठी तपासण्या मोफत 
- शहरी आणि ग्रामीण भागात ही सेवा असेल
- सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर पीडित महिलेला मोफत उपचार 


हा कायदा झाल्यानंतर सरकारने योग्य आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती 

बातम्या आणखी आहेत...