आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: ऑफिसच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंढवा येथील पासपाेर्ट कार्यालय असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून अायटी कंपनीत काम करणाऱ्या एका संगणक अभियंता तरुणीने उडी घेऊन अात्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. अश्विनी गवारे (२२, मु.रा.विठ्ठलवाडी, ता.शिरूर, पुणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.   


अश्विनी ही मुंढव्यातील ग्लाेबल टॅलेंट सर्च या साॅफ्टवेअर कंपनीत अाॅक्टाेबर २०१७ पासून कामास हाेती. गेल्या चार महिन्यांपासून या कंपनीत ती टेली काउन्सेलिंगचे प्रशिक्षण घेत हाेती. मात्र, चार दिवसांपासून ती रजा घेऊन घरी गेली हाेती.


साेमवारी सकाळी कामावर अाल्यानंतर तिने साडेअकरा वाजेच्या सुमारास सातव्या मजल्यावरून थेट खाली उडी घेत अात्महत्या केली. घटनेनंतर तिला काही जणांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...