आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड भागातील खळबळजनक घटना, बर्ड व्हॅली तलावात आढळला युवकाचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहरात गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांनाच दुसरी खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील बर्ड व्हॅली येथील तलावात अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात सापडला आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली अद्याप या इसमाचे नाव समजू शकले नाही.घटनास्थळी निगडी पोलीस दाखल झाले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार,चिंचवड मधील आज शनिवार संध्याकाळी बर्ड व्हॅली येथे अज्ञात २५ वर्षीय इसमाचा मृतदेह तलावात आढळून आला आहे.अद्याप हा खून आहे की आत्महत्या हे स्पष्ट झालेलं नाही.सायंकाळी साडेपाच वाजता हा प्रकार समोर आला.मयत इसमाचा मृतदेह पाण्यात असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवण्यात आले.

 

त्यानंतर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर युवकाला बाहेर काढण्यात आले.  दरम्यान मयत इसमाचा पॉकेट मध्ये पेंड्राव्ह आणि चिठ्ठी सापडली आहे.त्यामुळे पोलिसांना २५ वर्षीय इसमाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.या घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत

 

बातम्या आणखी आहेत...