आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम व्यवस्थापकाचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्यांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापकासह त्याच्या वाहनचालकाचे अपहरण करून १४ लाखांची खंडणी उकळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली अाहे. त्यांच्याकडून ६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी खंडणी म्हणून घेतलेल्या रकमेतून अडीच लाख लांबवणाऱ्या भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्याचे बीटमार्शल सुरेश बनसाेडे व अशाेक मासाळ यांना बडतर्फे केले आहे.   


विजय नवघणे, उत्तम भामे, गाैतम वसंत कांबळे, प्रदीप चंद्रकांत वाघ, विशाल कैलास शेलार  अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत कन्स्ट्रक्शन टाेटल इनवाॅर्टमेट या कंपनीचे व्यवस्थापक राहुल कटकमवार यांनी फिर्याद दिली हाेती. कटकमवार अाणि त्यांचा चालक विजय नवघणे हे २२ मे राेजी सायंकाळी वानवडीच्या कार्यालयातून जात हाेते. त्यावेळी दाेन माेटारसायकलवरून अालेल्या ४ अनाेळखी व्यक्तींनी कारला माेटारसायकल अाडवी लावून पिस्तूलचा धाक दाखवून दोघांना सात तास अाेलीस ठेवले. त्यांच्याकडून १४ लाख ३० हजार रुपये खंडणी घेतली. कात्रज परिसरात अाराेपींची कार संशयितरीत्या फिरत असताना दाेन बीट मार्शलने त्यांच्याकडे चाैकशी केली. त्यावेळी गाडीत पैसे दिसून अाल्याने त्यांनी २ लाख ४० हजार रुपये घेऊन अाराेपींना साेडून दिले. त्यानंतर अाराेपींनी बावधन परिसरात कटकमवार यांना साेडून दिल्यावर २५ मे राेजी त्यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...