आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात क्रिप्टाेकरन्सीबाबत देशातील पहिले अाराेपपत्र, फसवणुकीचे दाेन गुन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेनबिटकाॅइन कंपनीची स्थापना करून देशभरातील हजाराे नागरिकांची काेट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहरात दत्तवाडी पाेलिस ठाण्यात जानेवारी २०१८ मध्ये सर्वप्रथम गुन्हा दाखल झाला हाेता अाणि त्यानंतर निगडी पाेलिस ठाणे येथेही गुन्हा दाखल झाला..अातापर्यंत दत्तवाडी गुन्ह्यात ५७ नागरिकांची तर निगडी येथील गुन्ह्यात १७० नागरिकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले अाहे.

 

दाेन्ही पाेलिस स्टेशनला दाखल झालेल्या तक्रारीनुसार एकूण १७५० बिटकाॅइनची फसवणूक करण्यात अाली अाहे. त्यापैकी २०६ बिटकाॅइन, ७९.९९९ इथेरियम अाणि ३८ लाख ९६ हजार रुपये राेख जप्त करण्यात अाले. दत्तवाडीच्या गुन्ह्यात अातापर्यंत एकूण दहा अाराेपींना अटक करण्यात अाली असून, इतर १२ फरार अाराेपींचा पाेलिसांकडून शाेध सुरू अाहे. दत्तवाडी पाेलिस ठाण्याचे गुन्ह्यात ४३३ बिटकाॅइनच्या माध्यमातून एकूण चार काेटी रुपयांची फसवणूक झाली अाहे. याबाबत चार हजार पानी दाेषाराेपपत्र सायबर गुन्हे शाखेच्या पाेलिस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी साेमवारी विशेष न्यायाधीश अार.एन.सरदेसाई यांच्या न्यायालयात सादर केले अाहे.

 
मुख्य अाराेपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज(वय ३५,रा.दिल्ली), विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज(३१, रा. दिल्ली), पंकज नंदकिशाेर अदालखा(४०,रा. दिल्ली), हेमंत चंद्रकांत भाेपे (४६, रा.पुणे), हेमंत विश्वास सूर्यवंशी (५१, रा. पुणे), निकुंज वीरेंद्रकुमार जैन (२९,रा. दिल्ली), साहिल श्रीअाेमप्रकाश बागला(२८,रा. दिल्ली), व्यास नरहरी सापा (४६,रा. पुणे), काजल जितेंद्र शिंगवी (२५,रा. पुणे) यांच्या विराेधात साेमवारी दाेषाराेपपत्र दाखल करण्यात अाले. तर, दत्तवाडी पाेलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला १३ जानेवारी राेजी अाकाश संचेती या अाराेपीस अटक करून त्याच्या विराेधात मार्च महिन्यात न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर केले.   


दुसरे दाेषाराेपपत्र दाेन दिवसांत   
निगडी पाेलिस ठाण्यात व्यावसायिक भीमसेन बाबुराम अगरवाल (वय  ६५, रा.निगडी,पिंपरी-चिंचवड) यांनी गेनबिटकाॅइन घोटाळ्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली अाहे. अागरवाल यांची सुमारे एक काेटी रुपयांचे ९३.५ बिटकाॅइनची फसवणूक झालेली अाहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना त्याची व्याप्ती माेठ्या प्रमाणात वाढली असून अातापर्यंत दहा काेटी रुपयांचे १२२५ बिटकाॅइन फसवणूक झाल्याचे तक्रारी पाेलिसांना प्राप्त झाल्या अाहेत. याप्रकरणी १४ जून राेजी सायबर गुन्हे शाखेमार्फत न्यायालयात दुसरे दाेषाराेपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती पाेलिस उपअायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली अाहे.    


अशी झाली फसवणूक  
सिंगापूर येथे अमित भारद्वाज याने गेनबिटकाॅइन नावाची कंपनी  सुरुवातीला स्थापन केली. बिटकाॅइनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात अाले. गेनबिटकाॅइन कंपनीत अापला  एक बिटकाॅइन गुंतवल्यास दर बिटकाॅइनमागे दरमहा ०.१ टक्के बिटकाॅइन असे १८ महिन्यात एका बिटकाॅइनचे एकूण १.८ बिटकाॅइन कंपनी देते तसेच अापल्यानंतर इतरांना बिटकाॅइन देण्यास तयार केल्यास प्रत्येकी ०.०८ टक्के कमिशन गेन बिटकाॅइन कंपनी देते असे सांगण्यात अाले. गेनबिटकाॅइनमध्ये गुंतवणूकदारांनी माेठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याकरिता काही शहरांमध्ये माेटिव्हेशनल स्पीकर्स नेमण्यात अाले. सुरुवातीला लाेकांनी गुंतवणूक केल्यानंतर त्यांना गेनबिटकाॅइन कंपनीकडून परतावा देण्यात अाल्याने, गुंतवणूकदारांनी नंतर माेठ्या गुंतवणूक केल्या व त्यानंतर गुंतवणूकदारांना कंपनीकडून रिटर्न देण्यास बंदी झाली. गुंतवणूकदारांनी भारद्वाजकडे पाठपुरावा केल्यावर, भारद्वाज याने स्वत:च्या कंपनीची बिटकाॅइन सारखीच एमकॅप नावाची करन्सी तयार करून त्याद्वारे तुम्हाला परतावा देताे असे सांगून एक बिटकाॅइनच्या बदल्यात (बाजारात काेणतेही मूल्य नसलेले) चार एमकॅप वाटप करत गुंतवणूकदारांची फसवणूक केली. तसेच गेनबिटकाॅइन ही वेबसाइट बंद करून पुरावा नष्ट करत, जीबी-२१ ही वेबसाइट सुरू करत कंपनी सुरू असल्याचे गुंतवणूकदारांना भासवले. सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पाेलिसांच्या विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात अाली. त्यात दाेन पाेलिस निरीक्षक, तीन सहायक पाेलिस निरीक्षक, पाेलिस उपनिरीक्षक, १० प्रशिक्षित कर्मचारी तसेच एक सायबर तज्ज्ञ यांची नियुक्ती करण्यात अाली.    

 

फसवणुकीच्या पैशातून आरोपींनी परदेशात विकत घेतली
मालमत्ता अाराेपी अमित भारद्वाज याने गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या रकमेतून हाँगकाँग येथे अमेझ मायनिंग अँड ब्लाॅकचेन रिसर्च लि. व ग्रीन अाेव्हरसीज लि., बीव्हीअाय येथे क्रिप्टाेकॅपिटल कंपनी, इस्टाेनिया येथे क्रिप्टाे एएमसी लि, दुबर्इ येथे एबी मार्केटिंग कन्सल्टन्सी एफझेडई, एबीसी मेगा अलायन्स डीएमसीसी, एबीसी रिसर्च अँड कन्सल्टन्सी लि., ग्रेस अँड यंग कंपनी, अमेझ मेगा अलायन्झ, यूएसए येथे मेगा अलायन्स या कंपनीत पैसे गुंतवले. तर दुबई येथे जुमेरा लेक टाॅवर्स येथे ३१ व्या मजल्यावर सात अाॅफिसेस अंदाजे १० हजार स्क्वे.फूट जानेवारी- फेब्रुवारी २०१८ मध्ये अंदाजे दहा मिलियन एर्इडी (भारतीय रक्कम १७ काेटी), मरीन प्रिन्सेस टाॅवर येथे ५८ व्या मजल्यावर फ्लॅट नं. ५८१००, ६००- ७०० स्क्वे.फूट माहे अाॅक्टाे/नाेव्हें २०१७ मध्ये १.२  मिलियन एर्इडी (दाेन काेटी १२ लाख रुपये), बिझनेस बे, तमानी टाॅवर येथे चार अाॅफिसेस अंदाजे प्रत्येकी ५०० स्क्वे.फूट माहे जून २०१७ मध्ये दाेन मिलियन एर्इडी (तीन काेटी ४० लाख रुपये), बुर्ज खलिफा येथे फ्लॅट घेण्याकरिता तीन मिलियन एर्इडी (पाच काेटी दहा लाख रुपये) अशा प्रकारचे मिळकती दुबर्इ येथे खरेदी केल्याचे निष्पन्न झाले अाहे. सध्या, या प्रकरणातील मुख्य अाराेपी अमित भारद्वाज सध्या काेलकाता पाेलिसांच्या काेठडीत अाहे.

बातम्या आणखी आहेत...