आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रियकराचा धारदार चाकूने खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या प्रेयसीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रियकराचा तिघांनी धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सनी विलास शिंदे (१८) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी पुणे पाेलिसांनी तीन अाराेपींना अटक केली अाहे.    


अाकाश गायगाेळे (१९,रा.मार्केटयार्ड,पुणे), सुरजित कलानी (२४,रा.बिबवेवाडी,पुणे) आणि   रितेश बलीपाठक (३२,रा. मार्केटयार्ड,पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अाराेपींना पाेलिस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहे. याबाबत मार्केटयार्ड पाेलिस ठाण्यात अाकाश शिंदे याने अाराेपींविराेधात फिर्याद दिली अाहे. अाकाश यांचा मावसभाऊ सनी हा मार्केटयार्डमध्ये मजुरीचे काम करत हाेता. यादरम्यान त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले हाेते. सदर तरुणीची रितेश व अाकाश गायगाेळे यांनी छेड काढल्याने त्यांच्यात भांडणे झाली हाेती. याबाबतचा जाब विचारण्यासाठी सनी हा अाराेपींना भेटण्यासाठी गेला असता त्यांच्यात वाद हाेऊन अाराेपींनी सनीला मारहाण केली. तर सुरजितने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने  सनीवर वार केले. 

बातम्या आणखी आहेत...