आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कर्जामुळे ‘त्या’ तिघांनी लुटली 74 लाखांची रोकड, अवघ्या 72 तासांत पोलिसांकडून अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- पिंपळे सौदागर येथील एटीएममध्ये भरणा करायला आणलेल्या 74 लाखाची रोकड ही कर्ज बाजारी पनातून लंपास केली असल्याची माहिती उघड झाली आहे. तिघांच्या पाठीमागे सततचा कर्जबाजारीपणा आणि मोठा व्यवसाय सुरू करण्याच स्वप्न होते. त्यामुळेच हा सर्व खटाटोप करण्यात आला होता. चालकाला रक्कम न देता तिघांनी रक्कम वाटून घेतली.या प्रकरणी तिघाना अटक करण्यात आली आहे,तर चालक रणजित कोरेकर हा फरार आहे.

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,विठ्ठल जाधव,अमोल धुते आणि त्रिंबक नैरागे अशी मुख्य आरोपींची नावे आहेत.हे मूळ बीडचे असून तिघेही मित्र आहेत.यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.ब्रीनक्स कंपनीत अमोल धुते याने 15 दिवस काम केले. त्यामुळे तेथील माहिती संपादन करून तेथील काम सोडून दिले.वरील आरोपी आणि चालक रणजित कोरेकर हे दिघी परिसरात राहात असल्याने त्यांची चांगली ओळख झाली. यातूनच विठ्ठल जाधव आणि अमोल धुते यांनी रक्कम लंपास करण्याची योजना आखली.यात रणजित कोरेकर याला सहभागी करून घेतले.रणजित ला दारूचे व्यसन होते.आणि ठरल्याप्रमाणे 31 जानेवारी रोजी पिंपळे सौदागर येथील ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये कॅशियर आणि सुरक्षा रक्षक पैसे भरण्यासाठी उतरल्यानंतर गाडीचालक रणजित कोरेकर याने 74 लाख 50 हजार रुपये घेऊन गाडीसह पसार झाला. अवघ्या काही तासातच ब्रीनक्स कंपनीची गाडी भोसरी येथे सापडली होती. अवघ्या 72 तासातच गुन्ह्यांचा छडा लावत मुख्य आरोपीना वाकड पोलिसांनी गजाआड केली आहे.तिघाना बीड आणि औरंगाबाद येथून ताब्यात घेतलं आहे.यांच्याकडून 67 लाखाची रक्कम ताब्यात घेतली आहे तर त्यांनी उर्वरित पैशात मौज मज्या केली.यात त्यांनी मोबाईल,कपडे आणि पार्टीवर पैसे खर्च केले आहेत.मात्र ज्याने मेहनत घेतली त्यालाच एक रुपयाही न नेता केवळ दारूवर हे काम तिघांनी करून घेतले. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...