आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान अंदाजासाठी मान्सून मिशन ब्लॉकस्तरावर नेणार; डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून पूर, भूकंप, वादळे, सुनामी अशा प्रकारच्या अापत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील अाहेत. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज कळावा याकरिता २०१९ पर्यंत ‘नॅशनल मान्सून मिशन’ ब्लाॅक स्तरापर्यंत नेणार असल्याची माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी दिली.  

   
भारतीय उष्णदेशीय माैसम विज्ञान संस्थेच्या (अायअायटीएम) वतीने ‘प्रत्युष’ या हायपरफाॅर्मन्स काॅम्प्युटर प्रणालीच्या(एचपीसी) उद््घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. या वेळी खासदार अनिल शिराेळे, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, सहसचिव बिपिन चंद्रा, अायअायटीएमचे संचालक प्रा. रवी नानजुनदिहा व्यासपीठावर उपस्थित हाेते.    हर्षवर्धन म्हणाले, केंद्र सरकारने ४५० काेटी रुपये खर्च करून ‘प्रत्युष’ ही प्रणाली विकसित केली असून त्यामुळे जगात जपान, ब्रिटन व अमेरिका या देशानंतर भारत जागतिक हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एचपीसी संशाेधनात चाैथ्या स्थानावर पाेहोचला अाहे. सध्या २४ दशलक्ष शेतकऱ्यांना हवामानाचा पूर्व अंदाज वर्तवणारी व मार्गदर्शन करणारी माेबाइल मेसेज सुविधा आहे. २०१९ पर्यंत ४५ दशलक्ष शेतकऱ्यांना हवामान अंदाज माेबाइल मेसेज सुविधा पाेहोचवली जाईल, असे हर्षवर्धन म्हणाले. 


‘प्रत्युष’ एचपीसी प्रणालीची वैशिष्ट्ये 
- हवामानाचा अचूक पूर्वानुमान वर्तवण्याची सुविधा    
- वेगवेगळया स्मार्ट शहरातील वायू गुणवत्तेची माहिती उपलब्धता    
- सुनामी, वादळे, समुद्रीय हवामानाचे पूर्वानुमान     
- मच्छीमारांना समुद्रातील सक्षम मत्स्य क्षेत्रांची माहिती    
- एनसीएमअारडब्ल्यूएफमार्फत नाेएडात दुसरी २.८ पेटा फ्लाॅप एचपीसी सुविधाची उभारणी

बातम्या आणखी आहेत...